शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनहिरा’ला पतंगराव कदम यांचे नाव-शरद कदम : नामविस्तार ठराव मंजुरीसाठी आज सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 19:54 IST

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्या स डॉ. पतंगराव कदम यांचे नाव देण्याची मागणी होत होती. त्यामुळे नामविस्ताराचा ठराव मंजुरीसाठी शनिवार दि. ७ रोजी विशेष साधारण सभेचे आयोजन केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी दिली.ते म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी दुष्काळी भागातील लोकांच्या ...

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याडॉ. पतंगराव कदम यांचे नाव देण्याची मागणी होत होती. त्यामुळे नामविस्ताराचा ठराव मंजुरीसाठी शनिवार दि. ७ रोजी विशेष साधारण सभेचे आयोजन केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी दिली.

ते म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी दुष्काळी भागातील लोकांच्या शेतीला पाणी दिले. या भागाचे नंदनवन व्हावे यासाठी ते सतत कार्यरत होते. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने ते सामान्य जनतेच्या हृदयात होते. ताकारी, टेंभू योजना चालू राहण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असत. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा, ऊस तातडीने गाळपास जावा यासाठी वांगी येथे उजाड माळरानावर सोनहिरा साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली. त्यामुळे गरीब कुटुंबातील तरुणांच्या हाताला काम मिळाले. उसास योग्य दर मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कारखाना राज्यात अव्वल ठरला.

ते म्हणाले की, या साखर कारखान्यास डॉ. पतंगराव कदम यांचे नाव द्यावे, अशी मागणी लोकांतून मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यामुळे ‘डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कदमनगर, वांगी’ असा नामविस्तार करण्याचा व कारखाना कार्यस्थळावर त्यांचे भव्य स्मारक उभारले जाण्याचा, त्याठिकाणी त्यांचा जीवनपट मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचठिकाणी शेतकºयांसाठी अत्याधुनिक असे कृ षी मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.याचा निर्णय घेण्यासाठी शनिवार, दि. ७ रोजी दुपारी २ वाजता विशेष साधारण सभेचे आयोजन केले असून सभेसाठी सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे. 

 

टॅग्स :SangliसांगलीPatangrao Kadamपतंगराव कदम